रत्नागिरी : जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाच्या जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे जिल्ह्यातील ५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने केले रद्द तर पाचल मधील एका कृषी सेवा केंद्राचे तीन परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

रत्नागिरी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालय जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाच्यावतीने खते, किटकनाशके, बियाणे विक्री करणा-या कृषी सेवा केंद्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील संगमेश्वर मधील १, वाटद - खंडाळा मधील १, रत्नागिरीतील १, गोळप मधील १ व दापोली मधील १ अशा पाच कृषी सेवा केंद्रांचे बियाणे विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच पाचल मधील एका कृषी सेवा केंद्राचे ३ परवाने कायमस्वरुपीच रद्द करण्यात आला आहे.

स्टॉक रजिस्टर मेंटेन न ठेवणे, विक्री बिलांवर शेतक-यांच्या स्वाक्षऱ्या नसणे, किंवा विस्तृत बिले दिलेली नसणे, शिल्लक साठा आणि दरपत्रक डिस्प्ले न करणे या प्रकारातील कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. परवाने निलंबित केलेल्या कृषी सेवा केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यास व आवश्यक त्या त्रुटी पुर्ण केल्यास निलंबन आदेश रद्द करुन परत परवाने सुरु करुन दिले जातील, असे जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.