अलिबाग तालुक्यातील आवास ग्रामपंचायत परिसरातील लंपी आजारांवर मात करण्यासाठी सुमारे २२४ गुरांना लसीकरण मोहीम राबविण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात लंपी रोगांमुळे अनेक ठिकाणी गुरांवर लंपी रोगांच्या थैमानाने मोठे संकट निर्माण झाले होते.ज्यांचा उदरनिर्वाह गुर,धोरांवर शेतकरी वर्गालाआधार देण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.भीषण परिस्थिती ओढाऊ नये. म्हणून आवाज ग्रामपंचायत सरपंच अभिजीत राणे, उपसरपंच पूजा राणे, सर्व सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच डॉ. खवसकर पशुधन विकास अधिकारी, डॉ. चौलकर, डॉ. सपकाळ, डॉ. झिराडकर, एन. जे .पाटील, संकेत पाटील, करिष्मा आदी शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत आवास यांच्या संयुक्त विद्यमानाने लांबी आजारावर मात करण्यासाठी लसीकरण आयोजन केले होते. सदाशिवरामध्ये शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन शेतकऱ्यांच्या 224 गाई व बैलांना सदरची लस देण्यात आली. सदर शिबिर ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबवल्याबद्दल अनेक शेतकरी वर्गाने ग्रामपंचायत आवास सरपंच, उपसरपंच , सदस्य व ग्रामविकास अधिकारी तसेच शासनाचे पशुधन विकास अधिकारी व डाॅक्टराचे शेतकरी वर्गाकडून कौतुक केले जात आहे.