मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वांत मोठे बंड करीत शिवसेनेतील ४० आमदार फोडून थेट महाराष्ट्राची सत्ता काबीज केली.भारतीय जनता पक्षाच्या साथीने ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याचे त्यांचे तंत्र सुरूच आहे.म्हसळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी महाडचे आमदार शिंदे गटाचे प्रतोद भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.या प्रवेश कर्त्यामध्ये प्रसाद बोर्ले, कोळे सरपंच अमोल पेंढारी, बजरंग दलाचे प्रवीण (बाबू) बनकर,बबन वाजे,दिपेश जाधव,राजेंद्र मोहिते,मनोज निगुडकर यांचा समावेश आहे.यावेळी म्हसळा तालुका शिंदे गट नवीन कार्यकारणी निवड करण्यात आली.तालुका प्रमुखपदी प्रसाद बोर्ले,अमोल पेंढारी यांची संपर्क प्रमुखपदी तर उप तालुका प्रमुख प्रवीण (बाबू) बनकर यांची निवड करण्यात आली.पक्षांतर केलेल्या सेना कार्यकर्त्यांनी आपण शिवसेनेत असताना म्हसळा तालुक्यात कोणतेही विकासकामे झाली नाहीत.येणाऱ्या आगामी काळात आम्ही म्हसळा तालुक्यात विकासाची गंगा आणू असे नवनिर्वाचित तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.