कन्नड तालुक्यातील औराळा येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू हायस्कूलला आमदार सतीश चव्हाण यांनी सोमवारी अचानक भेट दिली . झाडाखाली बसलेल्या विद्यार्थ्यांची जागेवरच शाळा घेत शिक्षकासारखे इंग्रजीतून थेट प्रश्न विचारून शाळेच्या गुणवत्तेची तपासणी केली . रोजच्याप्रमाणे सोमवारी पहिल्या सत्राची शाळा भरलेली होती . दुपारच्या सत्राचे काही विद्यार्थी विद्यार्थिनी झाडाखाली घेऊन बसले होते . आमदार चव्हाण गाडी अचानकच झाडाखाली बसलेल्या विद्यार्थिनीजवळ येऊन थांबली आणि आमदारांनी शिक्षकासारखे विद्यार्थ्यांना थेट इंग्रजीतून प्रश्न विचारायला सुरुवात केली . सुरुवातीला काही मिनिटांसाठी विद्यार्थी थोडे गोंधळे , मात्र नंतर आमदार महोदयांनी विचारलेल्या यांची हे सर्व प्रश्नांची विद्यार्थ्यांनी इंग्रजीतूनच अचूक उत्तरे दिली . दरम्यान आमदार चव्हाण एखाद्या शाळेला भेट देणार असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांना आधीच असल्याने ते तयारीत असतात . परंतु सोमवारी मात्र आमदार सतीश चव्हाण यांनी अचानक शाळेला भेट दिल्याने शिक्षकांची धांदल उडाली . मात्र विद्याथ्र्यांनी आमदार चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने शिक्षकांचा जीव भांड्यात पडला . मुख्याध्यापक कैलास नलावडे , ज्ञानेश्वर वाघ , अण्णासाहेब नलावडे , मनोज चव्हाण , अप्पासाहेब भोजने , पर्यवेक्षक एस . पी . दाभाडे , एस . एस . बागूल , ए . एम . राजपूत , एम . एल . खडबडे , जे . एस . बिरारी , जी . एस . नाईक , झेड . आर . गांगुर्डे , ए . ए . नलावडे , आर . के . पवार , बी . जी . शेख , आर . व्ही . जाधव , ए . एम . जैस्वाल , एस . डी . कमानदार , कसबे , बी . बी . आहेर , ए . यू . नलावडे , आर . एम . काटकर , डी . एम . पारधी , ए . डी . वडगावकर , एस . एस . साळुंके , एन . बी . निकम , निवारे , चव्हाण आदींची उपस्थिती होती