बीड - बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड अर्थात सावरगाव या रॅलीला सकाळीच मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन निघालेल्या खा मुंडे यांचे रस्त्यात जागोजागी उस्फुर्त स्वागत होत आहे. शेकडो वाहनांची ही रॅली सावरगाव येथे पोहचल्यावर पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याला संबोधित करतील.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
आज सकाळी सहा वाजता प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. गोपीनाथ गडावरून निघालेली रॅली सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव अशी असणार आहे. तर यावेळी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत पाहायला मिळत आहे.