विविध क्षेत्रात दैदीप्यमान कार्य करत कर्तव्य निभावणाऱ्या समाज धुरिणांचा यथोचित गौरव ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडाच्या पवित्र मंचावर मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने आज मंगळवारी गौरव करण्यात आला.
राष्ट्र संत भगवानबाबांनी समाजाला शिक्षणातून सन्मार्गाची दिशा दिली. त्यांचे जन्मस्थळ ही पवित्र भूमी असून दरवर्षी विजयादशमीच्या दिनी लाखो जणांचा जनसागर येथे लोटतो.
आज मंगळवारी बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठान च्या वतीने डॉ. संजय तांदळे यांनी संत भगवान बाबा ट्रस्टचे अध्यक्ष संदेश सानप ( धार्मिक), विजय गोल्हार( सामाजिक), रामचंद्र सानप( वैचारिक), प्रा.बिभिषण चाटे( लेखन), महेंद्र मुधोळकर( पत्रकारिता) यांचा सामाजिक शैक्षणिक धार्मिक वैचारिक पत्रकारिता आदी सह क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीबद्दल शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संत भगवान बाबांचे विविध भागातून उपस्थित भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या सन्मानामुळे एकता बंधुत्व मानवतावाद ऐक्य आदी मूल्यांची जोपासना करण्याकरता समाज धुरिणांना ऊर्जा मिळते याचे समाधान वाटते अशी प्रतिक्रिया मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष डॉ.संजय तांदळे यांनी व्यक्त केली.