गोरेगाव हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याची तहसीलदार सेनगांव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगांव पोलीस स्टेशन हद्दीत गल्लोगल्ली देशी दारू खुल्याआम विक्री होत असल्याबाबत तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून निवेदन करते गोपाल उचाडे व अनंदा बोडखे राहणार गोरेगाव यांनी आज दिनांक 4 ऑक्टोंबर वार मंगळवार रोजी सादर करून चार ते पाच दिवसांमध्ये  अवैध धंदे बंद नाही झाले तर गोरेगांव येथील अप्पर तहसील समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील करण्यात आला आहे