कन्नड: जनावरांच्या सुरक्षेसाठी गोठ्यात केला जातोय कडुलिंबाच्या पाल्याचा धूर तालुक्यातील करजखेड, नागापूर, घाटशेंद्रा, उबरखेडा,उब़रखेड तांडा, सावरगाव चिमणापूर, या गावातील परिसरामधील शेतकरी आपल्या जनावरांना लम्पीची बाधा होऊ नये यासाठी रोज सायंकाळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जनावरांच्या गोठ्यात कडुलिंबाच्या पाल्याचा धूर करून गोमाशा व माशांचा उपद्रव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत . जनावरात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे . माशा , गोचीड , गोमाशामार्फत लम्पीचा प्रसार होतो . त्यामुळे कडुलिंबाच्या पाल्याचा धूर केला जात आहे .