चिपळूण : शहरातील महर्षी कर्वे भाजी मंडईच्या आवारात अतिक्रमण केलेल्या भाजी विक्रेत्यांवर येथील नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई केली. या भाजी विक्रेत्यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या लाकडी बांबूची सर्व छपरे जेसीबीद्वारे हटवून त्यांचे साहित्य देखील जप्त केले. तसेच तेेथे पुन्हा अतिक्रमण होवू नये यासाठी जेसीबीने खोदाई केली आहे. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

दरम्यान, तरीही त्या विक्रेत्यांनी त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. सध्या बाजारपेठेतील रस्त्यालगत भाजी विक्रेते व अन्य व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यातच महर्षी कर्वे भाजी मंडईच्या दर्शनी भागात फेरीवाले व भाजी विक्रेते यांनी अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जून महिन्यात नगर पालिकेने चक्क तारेचे कुंपण घातले. तसेच या जागेत कोणत्याही व्यावसायिकाने अतिक्रमण करू नये, असेही आवाहन केले होते. परंतु त्या ठिकाणच्या भाजी विक्रेत्यांनी नगर पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद न देता आतमध्येच दुकाने थाटली होती. इवढेच नाही तर छत उभारण्याचाही प्रयत्न काहींनी केला होता. हा प्रकार नगर पालिकेच्या लक्षात येताच त्या विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र आता त्याच जागेत पुन्हा अतिक्रमण झाल्याने गुरूवारी नगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही जोरदार कारवाई केली. त्यामुळे भाजी मंडई परिसराने मोकळा श्‍वास घेतला आहे.