रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ देव-घैसास-कीर कला,वाणिज्य,विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ व जेट इंडियाच्या IIBM संस्था व महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पस इंटरव्ह्यू हे हवाई क्षेत्र, ट्रॅव्हल व टुरिझम क्षेत्र अशा विविध १७ क्षेत्रातील जागांसाठी आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये महाविद्यालयाच्या आजी व माजी विद्यार्थीनी मोठया प्रमाणावर सहभाग नोंदविला. तसेच या मध्ये एकूण 13 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कॅम्पस इंटरव्ह्यू सुरु होण्यापूर्वी सुरवातीला जेट इंडियाच्या मॅनेजर सौ. रिंकू पाटील, जेट इंडियाचे करिअर तज्ञ श्री. अभिजित लोहकरे व सहकारी यांचे महाविद्यालय व संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. तसेच IIBM संस्थेने देखील सहकार्याबद्दल भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह श्री सुनिल वणजू, भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारणी सदस्य श्री. अनंत आगाशे व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील व आय. क्यू. ए. सी. समन्वयक वसुंधरा जाधव यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आभार मानले.
सौ रिंकु पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थांना प्रोत्साहीत केले. त्यानंतर श्री सुनिल वणजू, श्री अनंत आगाशे व महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांनी होणार्या मुलाखतीसाठी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. या मुलाखतींचे संपूर्ण नियोजन आय. क्यू. ए. सी. विभागांतर्गत करण्यात आले होते. विद्यार्थांचे रजिस्टेशनाचे काम सहा. प्रा. ऋतुजा भोवड यांनी पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहा. प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहा. प्रा. अनन्या धुंदूर यांनी केले व आभार सहा. प्रा. निलोफर बन्नीकोप यांनी केले.तंत्रसहाय्य सहा. प्रा. विनय कलमकर यांनी केले.