रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव उत्साही वातावरणात साजरा होत आहे. नवरात्रौत्सवाने परदेशी पाहुण्यांनाही भुरळ घातली असून, या उत्सवात ही मंडळी सहभागी होत आहेत.
इस्राईलवरून पर्यटनासाठी रत्नागिरीमध्ये आलेल्या नोआम या इस्राईल नागरिकही नवरात्रौत्सव पाहून भारावून गेला. रत्नागिरी येथील श्री मित्र मंडळ , साळवीस्टॉप नाचणे रोड येथे शिस्तबद्ध दांडिया , गरबा नृत्य पाहून त्यालाही मोह आवरला नाही आणि चक्क त्याने नृत्यामध्ये सहभाग घेतला. सलग दोन दिवस याठिकाणी त्याने हजेरी लावली. नोआम याने इस्राईलचा मिलेटरी मध्ये काम केले असून तो सध्या भारत पर्यटन दौऱ्यावर आहे.