संगमेश्वर : वृक्ष तोडीमुळे व वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे पर्यावरणात होत असलेला असमोतलाने जन सामान्यांना विविध समस्या व आजारांना सामोरे जावे लागत आहे. यासाठीच शासन वृक्ष लागवडीच्या अनेक योजना राबवित आहे. या योजने नुसती वृक्ष लागवड करून नंतर दुर्लक्ष न करता ती झाडे संगोपन करून वाढविली पाहीजेत.. ती सरकारची जबाबदारी आहे. असे न समजता ती आपली जबाबदारी आहे. असे समजून नियोजनबद्ध पद्धतीने जोपासली तरच पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.. त्याकरता नागरीकांना झाडे लावा. झाडे जगवा या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला पाहीजे असे प्रतिपादन तहसीलदार सुहास थोरात यांनी केले. 

 राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता या 17सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते 2 आक्टोबर महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त या कालावधीत सेवा पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात आला, त्याचा भाग म्हणून भारतीय जनता पार्टी संगमेश्वर तालुका वतीने देवरुखातील केशवसृष्टी भागात सांगता सोहळा आयोजित करून वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला होता, 

यावेळी तहसीलदार बोलत होते. त्यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये,मुख्यधिकारी चेतन विसपुते,मुकुंद जोशी,अभिजीत शेट्ये,नगरसेवक सुशांत मुळ्ये, जेष्ठ नागरिकांसह भाजपचे पदाधिकारी,उपस्थीत होते. यावेळी केशवसृष्टी भागात विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपणकरण्षात आले,त्या वृक्षाचेसंवर्धन केशवसृष्टीतील नागरिक व नगरपंचायत यांचे सहकार्याने होईल अशी ग्वाही नगरपंचायतीचेवतीने नगराध्यक्ष सौ शेट्ये यांनी दिली.