ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो" या सारखे लोकगीते म्हणत आमदार प्रणिती शिंदें सहभागी

ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो" या लोकगीतेवर आमदार प्रणिती शिंदें यांनी फेर धरला 

सोलापूर - शहरातील पूर्व भागातील तेलंगाणा संस्कृती ब्रतकम्मा उत्सवाच्या माध्यमातून दिसून येते. अष्टमीच्या दिवशी घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, रोगराई कमी होण्यासाठी, सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी पदमशाली समाजातील महिला भगिनी पारंपारिक वेशभूषेत ब्रतकम्मा समोर फेर धरून आकर्षक फुलांनी सजविलेल्या ब्रतकम्मा समोर देवी ची आराधना करतात.

यावेळी कॉग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह महिला भगिनींनी आकर्षक फुलांनी सजविलेल्या ब्रतकम्मा भोवती "ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो" या सारखे लोकगीते म्हणत आमदार प्रणिती शिंदें यांच्यासह महिलांनी फेर धरला .

घरात सुख समृद्धी, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, सर्व इच्छा प्राप्तीसाठी, देवीची आराधना केली.