सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते" च्या गजरात शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या धार्मीक वातावरणात साजरा होत आहे. शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पूजनाचा उत्सव. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठासह राज्यभर हा उत्सव सुरु आहे. नवरात्रीच्या पावन पर्वावर संपूर्ण देशभरात आदिशक्तीच्या उपासनेत भावीकभक्त तल्लीन झाले आहे. अशातच आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती शहरातील राधा नगर येथील राधानगर दुर्गोत्सव मंडळाला भेट दिली. देवदेवतांचे उत्सव साजरे करतांना या दैवी शक्तींचे आशिष लाभण्याबरोबर आपल्या अंगी सत्व गुणांचा संचार व्हावा ही प्रामाणिक इच्छा बाळगीत भावीक भक्तांच्या वतीने यावेळी माँ नवदुर्गेची उपासना करण्यात आली. या दरम्यान आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते राधानगराची आई माऊलींची आरती करण्यात आली.
यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी देविमातेचे दर्शन घेऊन कृपाशीर्वाद घेतले. यावेळी नवरात्रीची सुरुवात सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योगाने झाली आहे. हे दोन्ही योग धनवृद्धी आणि कार्यसिद्धी यांच्या दृष्टीने अतिशय विशेष मानले जातात. अशा या पावन पर्वावर सर्व भावीकभक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी व सर्वांना सुख,समृद्धी, व दीर्घकालीन आरोग्य लाभण्यासाठी सुलभाताई यांनी आई भगवतीची मनोभावे प्रार्थना केली.बदलत्या काळात सक्षम होत असणाऱ्या स्त्रीशक्तीमुळे हा महिलाशक्तीचा अस्सल जागर ठरतो आहे. हा नऊ रात्रीचा कालखंड असल्याने हा नवरात्रोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.अशा या मंगल व पावन पर्वावर राधानगराची आईमाऊलीं विराजमान झालेल्या या स्थानिक मैदानाचा आगामी काळात लवकरच कायापालट होणार आहे. यासोबतच स्थानीय नागरिकांना येथील प्रांगणात अपेक्षित सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत आहोत.