नवरात्र उत्सवानिमित्त बीड शहरामध्ये डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसेच विजेते उमेदवारांना बक्षीस वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बीड शहरातील ग्रामसेवक कॉलनी नगर रोड बीड येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात डान्स स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये विजेते उमेदवारांना बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक शिवानी अभिजीत दोडके द्वितीय पारितोषिक अनुष्का मोहन खांडे तृतीय पारितोषिक प्रांजली जगताप यांना मिळाले

सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सरपंच अंबादास गुजर भरत अनपट राठोड साहेब आदींची उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण घुमरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती