परभणी(प्रतिनिधी)प्रगती नगर व पवनसुत नगर येथील रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवुन नागरी सुविधा देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.3) प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगरपालिकेविरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शहराअंतर्गत येणार्‍या 20 वर्ष जुन्या कारेगांव रोडवरील प्रगती नगर व खानापुर रोड वर असलेल्या पवनसुत नगर येथे मनपा ने अजूनही नागरी सुविधा पुरवल्या नाहीत. या भागात कुठल्या प्रकारचे रस्ते नाहीत, गटारे नाहीत व घंटागाडी येत नाही त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या भागात तात्काळ नगरी सुविधा पुरवाव्यात या मागणी साठी परिसरातील नागरिकांसह प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारा वर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षनीय होता. संतप्त आंदोलकांनी या वेळी महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मनपाचे शहर अभियंता वसीम पठाण यांनी निवेदन स्वीकारले. दोन्ही नगरांत 8 दिवसांच्या आत नगरी सुविधा उपलब्ध करून प्रगती नगर व पवनसूत नगर येथील रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजावणे, गटारे साफ करावी, घन्टा गाडी सुरु करावी या मागण्या मान्य न केल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटणीस वैभव संघई, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शेख बशीर, रमाताई गंधारे, मिनाताई कांबळे, नर्मलाताई भारशंकर, ताराबाई मेश्राम, कमलबाई हनवते, आनंद कांबळे, ऍड. संजय खिल्लारे, दिलीप खिल्लारे, दीपक जोधळे यांच्यासह महिला व पुरुष सहभागी झाले होते.