कशेळी ग्रामपंचायतीमध्ये परिसर स्वच्छ करीत गांधी- शास्त्री जयंती साजरी
रत्नागिरी : तालुक्यातील कशेळी ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची ११८ वी जयंती साजरी करण्यात आली.सेवा पधरवड मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री, संत तुकडोजी महाराज , संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
दरम्यान कशेळी ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. त्यामध्ये ग्रामसेवक अनिश्का हातीसकर यांनी कर्मचार्यांसमवेत स्वच्छता करीत कशेळीवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला. शांततेसह अहिंसा विचार समाजामध्ये रुजविणारे महात्मा गांधी यांनी सार्यांना स्वच्छततेचाही संदेश दिला. त्यांच्या या संदेशाचे कशेळी येथील ग्रामपंचायतीत महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पालन केले. या स्वच्छता अभिनामध्ये सरपंच दीपक बावकर, उपसरपंच चंद्रकांत कांबळे, कोंडगाव मुख्याध्यापक राजाराम खाकम, आशा सेविका ललिता परवते, सदस्य सुरेश ताम्हणकर , सदस्य रसिका परवते, सुषमा परवते, विजय ठोंबरे, दीपक कांबळे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. परिसर स्वच्छ करीत स्वच्छता अभियानाने गांधी-शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.