शिरूर (का.) ता. शिरूर जि.बीड येथे आयोजित केलेल्या मराठा आरक्षण मोर्चासाठी नांदेड ते शिरूर कासार सायकल प्रवास करत बाळासाहेब इंगळे पाटील बीडमध्ये दाखल झाले

यावेळी त्यांनी शिवसंग्राम भवन येथे येवून मराठा संघर्ष योद्धा, लोकनायक स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन केले आणि आपला पुढील प्रवास सुरू केला यावेळी त्यांच्या या सायकल यात्रेस बळ आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी शिवसंग्रामच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी मनोज जाधव, ज्ञानेश्वर कोकाटे, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,नामदेवराव धांडे,पांडुरंग बाहिर,मनीषा पाटील, तकिक आदी उपस्थित होते.