जनता न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी माबुद खान

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

बोरी येथील जयकुमारजी जैन सार्वजनिक* वाचनालयाच्या 23 व्या वर्धापन* दिनानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची वेशभूषा स्पर्धा

वाचनालयाच्या अध्यक्षा मीना जैन ,उपाध्यक्ष पवनकुमार ओझा, सचिव बालप्रसाद सोमानी, संचालक सूर्यप्रकाश सोनी, दिपक राजुरकर ,सौ.कांता सोमानी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ध्वनिक्षेपकाद्वारे महात्मा गांधींचे स्वच्छतेविषयीचे विचार नागरिकांना सांगण्यात आले .

मेन रोड ,पेठ गल्ली ,चौधरी गल्ली, राम मंदिर मार्गे ही रॅली जैन वाचनालयात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. वेशभूषा स्पर्धेत व स्वच्छता संदेश रॅली सहभागी झालेल्या सर्वांचे ग्रंथपाल नेमीनाथ जैन यांनी आभार मानले .त्यानंतर बोरी येथील पत्रकारांच्या हस्ते वर्धापन दिनानिमित्त महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून केल्याबद्दल वाचनालयाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन चौधरी, भास्करराव चौधरी, बोरी,यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून वाचनालयाचा आजपर्यंतचा आढावा उपाध्यक्ष पवनकुमार ओझा यांनी यावेळी व्यक्त केला.