संगमेश्वर : देशात स्वच्छता अभियानासह अनेक कार्यक्रम राबविले जातात. त्याकडे नागरीकांना शासनाचा कार्यक्रम म्हणून न पाहता सजग नागरीक म्हणून आपली जबाबदारी ओळखून संघटीतपणे सहभाग घेतल्यास अभियान वा मोहीमा राबविणेची गरज भासणार नाही. असे सांगताना अशा अभियानात आपला तालुका मागे का पडतो याचे हि आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे असे स्पष्ट मत तहसिलदार सुहास थोरात यांनी व्यक्त करत नागरीकांना आपली कर्तव्ये दक्षपणे फार पाडली तरच गावाची व तालुक्याची मान व शान वाढल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद व्यक्त केला.. 

 २ आँक्टोबर महात्मा गा़ंधी जयंती निमित्त देवरूख शहरात संत निरंकारी मिशन व नगर पंचायत देवरूख यांचे संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व स्वच्छ्ता अभियान राबविणे आले.

     या अभियानाची सुरूवात सावरकर चौक देवरूख येथे सकाळी तहसिलदार थोरात.पो. नि. जाधव. नगराध्यक्षा सौ. शेट्ये. बिडीओ चौधरी.रोहन बने. निरंकारी मिशनचे केसरकर सर मान्यवरांचे उपस्थीतीत करण्यात आली..त्यावेळी मार्गदर्शन करताना ते थोरात बोलत होते. 

देवरूख शहरातील सामाजिक कार्यकर्ते. सामिजक संस्था. विविध मंडळ. नगर पंचायत यंत्रणा व निरंकारी मिशनचे सर्व कार्यकर्ते यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत सावरकर चौक ते मच्छिमार्केट. व शहरातील काही भागात हि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली..

 शहरातील प्रत्येक नागरीकांनी आपली जबाबदारी समजून खबरदारी घेत मनापासून आपले घर व परिसर नित्यपणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केलेस शहर ही स्वच्छ राहील. त्यासाठी भविष्यात अशा अभियान राबविणेची गरज पडणार नाही.. असा आशावाद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी व्यक्त केला.. 

या अभियात तहसिलदार सुहास थोरात.नपचे मुख्याधिकारी चेतन विसपुते. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये. उपनगराध्यक्ष वैभव कदम. पोलिस निरिक्षक बळीराम जाधव. गटविकास अधिकारी चौधरी. माजी जिप अध्यक्ष रोहन बने. काकडे अकँडमीचे युयुत्सू आर्ते. राजू वणकुंद्रे. आकाराचे निलेश चव्हाण. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश सप्रे. नगरसेवक सुशांत मुळे. प्रफुल्ल भुवड.राणू कोचिकर. सागर शेट्ये. माजी नगराध्यक्ष अभी शेट्ये. निरंकारी मिशनचे केसरकर व पदाधिकारी यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.