पैठण : पैठण येथील शालिवाहन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्मचारी केदारनाथ खंडागळे यांना "जिवन गौरव" पुरस्कार देऊन वार्षिक सभेत सपत्नीक सत्कार करण्यात आला.सलग 25 वर्षे पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत.संत ज्ञानेश्वर उद्यान मार्गावरील माहेश्वरी धर्म शाळा सभागृहात हि वार्षिक सभा पार पडली.यावेळी बोलतांना चेअरमन किशोर चव्हाण यांनी सांगितले की,संस्थेच्या स्थापनेपासून केदारनाथ खंडागळे हे पिग्मी एजंट म्हणून कार्यरत आहेत.सचोटी व निष्ठेने काम करत असतांना संस्थेच्या हितासाठी त्यांनी दिर्घकाळ सेवा केली.व अजूनही कार्यरत आहेत.असे त्यांनी स्पष्ट केले.केदारनाथ खंडागळे व राजश्री केदारनाथ खंडागळे यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन "जिवन गौरव" पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी व्हा. चेअरमनडॉ. जयंत जोशी,सचिव प्रकाश कासलीवाल,संचालक दिपक आहुजा,गणेश लोहिया, दिपक लखमले,बाबासाहेब राऊत, डॉ.पंडित किल्लारीकर,सुनील शेळके,अँड राजेंद्र गोर्डे,सुमनबाई म्हस्के,व सुमनबाई चव्हाण अदि उपस्थित होते.