मंडणगड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) जिल्हा रत्नागिरी या पक्षाच्या जिल्हा सरचिटणिस पदी माजी जिल्हा युवक अध्यक्ष, नगरसेवक आदेश मर्चंडे यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषद शासकीय निवासस्थान खेड येथे जिल्हा कोषाध्यक्ष गौतम तांबे यांच्या अध्यक्षतेखाली व कोकण विभाग संपर्कप्रमुख आर. पी. येलवे, शंकर तांबे, दादासाहेब मर्चंडे, प्रितम रुखे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या सभेत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभेस जिल्ह्यातील व मंडणगड तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. नगसेवक आदेश मर्चंडे नियुक्तीबद्दल कौतुक होत आहे.