चिपळूण : शहरातील बाजार पेठेतील नाथ पै चौक येथील रूमानी चेंबर व रंगोबा साबळे रोडवरील नजराणा अपार्टमेंट या दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने छापा टाकून ४ लाख ४६ हजार ८५४ रूपयाचा गुटखा जप्त केला असून चिपळूण पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून अन्य गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई गुरुवार दि. २९ सप्टेंबर रोजी करण्यात आली. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

रत्नागिरी येथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी दशरथ मारूती बांबळे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात मिर्याद दिल्यानुसार गुरुवारी सकाळी ११ वाजता दक्षता पथक मुंबई कार्यालय व अन्न व औषध प्रशासन, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण शहर येथील खालील दोन गुटखा व्यापाऱ्यांवर धाड टाकून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू इत्यादी जप्त करण्यात आला आहे. नाथ पै चौक येथील रूमानी चेंबर येथे आरोपी सिद्धेश सचिन खेराडे (२२, रा. उक्ताड, गणेश मंदिर शेजारी, चिपळूण) याच्याकडून ३ लाख ४६ हजार ४७९ रूपयाचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व तत्सम पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याच्यावर काल गुन्हा दाखल झाला आहे.

रंगोबा साबळे मार्गावरील नजराना अपार्टमेंट तळमजला येथे आरोपी १) शाहनवाज मुस्ताक कच्छी (१८, रा. नजराना अपार्टमेंट, पहिला मजला, चिपळूण),२) साठामालक मुस्ताक झिकर अब्दुल गणी कच्छी (४०, रा. नजराना अपार्टमेंट, चिपळूण), ३) जागा मालक समीर अयुब शेख (रा. चिपळूण) यांच्याकडून एकूण एक लाख ३७५ रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व तत्सम पदार्थ जप्त करण्यात आले असून या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी रत्नागिरी श्री. द. मा. बांबळे, श्री. वि. ज. पाचुपते व गुप्तवार्ता विभाग कोकण विभाग, ठाणे श्री. अरविंद खडके, डॉ. राम मुंडे यांनी सहभाग घेतला मुस्ताक कच्छी याच्यावर यापूर्वीही कारवाई झाली होती. तरीही त्याचा व्यावसाय तेजीत होता. आपण सर्व बंद केले आहे पोलीस व अधिकारी खूप त्रास देतात त्यापेक्षा धंदा बंद केलेला बरा म्हणून मी आता धंदाच करणे सोडून दिल्याचे तो सांगत असे. परंतु आता कारवाई झाल्याने त्याचे पितळ उघडे पडले आहे. शहरात अद्याप अनेक गुटखा किंग असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी असतो या कारवाईनंतर त्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरात याबाबत खळबळ उडाली असून जोरदार चर्चा सुरु आहे.