पैठण : पैठण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी ;1 राजेंद्र बोरकर यांनी पैठण आपेगाव प्राधिकरणाच्या माध्यमातून तिर्थक्षेत्र विकास कामे उत्कृष्टरित्या केल्याबद्दल त्यांचा अभियंता दिनानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी -1राजेंद्र बोरकर यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद अंतर्गत अभियंता दिन 2022च्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता संघटना,सरळसेवा प्रविष्ट वर्ग -1अभियांत्रिकी अधिकारी संघटना,व इंडियन इंजिनियर्स फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन कार्यक्रम आयोजित करून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभियंता यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्यानुसा औरंगाबाद विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या किर्यालयाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-1 राजेंद्र बोरकर यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन अभियंता दिनानिमित्त त्यांचा प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे,लाभक्षेत्र विकास प्राधिकरण औरंगाबाद मुख्य अभियंता जयंत गवळी,स्वामी विष्णू पादानंदजी महाराज,मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता विश्वनाथ नाथ,लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार,दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचेअधिक्षक अभियंता एस एस भगत,सार्वजनिक बांधकाम औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक अभियंता विवेक बडे,सार्वजनिक बांधकाम मंडळ उस्मानाबादचे अधिक्षक अभियंता बी.एन थोरात,औरंगाबाद पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता अमोल अवलगावकर,दक्षता व गुण नियंत्रण मंडळ विद्युतचे अधिक्षक अभियंता एस.बी.चौगुले,प्राधिक्षक जलसंधारण अधिकारी व मृद जलसंधारण मंडळाचे वसंत गालफाडे,सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबादचे उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ एस.एस.चौधरी,कनिष्ठ अभियंता संघटना,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इंजि.जयवंत गायकवाड,कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र सरचिटणीस एम.आय.सय्यद,राजपत्रित अभियंता संघटनाविभागीय सचिव अजय टाकसाळ,सदस्य रवींद्र तोंडे,सरळसेवा प्रविष्ट वर्ग-1अभियांत्रिकी संघटना सदस्यसह विविध मान्यवर उपस्थित होते.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं