औरंगाबाद : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतकरी दांपत्यास बेदम मारहाण करून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटून नेल्याची घटना शनिवारी रोजी पहाटे पाचोड येथे घडली . चोरट्यांच्या मारहाणीत चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत . यातील एका वयोवृद्ध महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . यासंबधी अधिक माहिती अशी , कन्नड तालुक्यातील सावरगाव येथील माणिकराव भाऊराव जंगले ( ६५ ) , केसरबाई माणिकराव जंगले ( ५५ ) , लक्ष्मण माणीकराव जंगले ( ३५ ) , सरला लक्ष्मण जंगले ( ३० ) यांनी वर्षभरापूर्वी धुळे • सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत पाचोड येथे विजुसेठ मोटवाणी यांच्या मालकीची ३२ एकर जमीन ठोका पद्धतीने कसण्यासाठी घेतली . हे कुटुंब महामार्गालगतच सदर जमिनीत पत्र्याचे शेड करून वास्तव्यास आहेत . शुक्रवारी रात्री हे कुटूंब दिवसभराचे कामे उरकून रात्री झोपी गेले . मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या सुमारास लक्ष्मण जंगले यांची मुले रुद्रा जंगले ( वय - ४ ) व अक्षरा जंगले ( २ ) ही रडत असल्याने सर्व कुटुंब झोपेतून उठलेली होती . तोच त्यांना त्यांच्या शेडकडे कुणीतरी मोबाईल चमकवित असल्याचे पाचोड हे राष्ट्रीय महामार्गावरील संवेदनशील गाव असून याठिकाणी गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत . नेहमी मारामाऱ्या , चोऱ्या , वाहतुकीची कोंडी , मोबाईल , दुचाकी चोरीच्या घटनांत सातत्याने घडत आहेत . पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा . दिसले . त्यांना चोरट्यांचा संशय आल्याने त्यांनी एकमेकांना सांगितले . तोच संबंधित चोरट्यांनी त्यांना दरवाजा उघडा , आम्ही तुमची माहिती घेण्यासाठी आलो असून तुम्ही कन्नडचे आहात म्हणून सांगितले . त्यावेळी या सर्वांनी बाहेरून बोला . आम्ही दरवाजा उघडत नाही असे सांगून केसरबाई यांनी दरवाजा उघडू नये म्हणून आतून पाठ लावून रेटा दिला . तोच चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात खिडकीतून जोराने लाकडी दांडा मारला . यात केसरबाईचे डोके फुटून त्या जमिनीवर कोसळल्या . चोरट्यांनी पत्र्याच्या घरात प्रवेश करून त्यांना काठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली . यावेळी जंगले कुटुंबिय चोरट्यांना भागवतराव नरवडे , नागरिक , ( रा.पाचोड ) काय न्यायचे ते घेऊन जा , परंतु मारू नका म्हणून विनवणी करू लागले . चिमुकल्या मुलांना मार लागू नये म्हणून मुलांची आजी केसरबाई , आई सरला त्या मुलांवर झोपून काठ्यांचा मार झेलत होते . एवढ्यात सरलाने कोळी बोडखा येथील शेख सुभान बुन्हाण यांना फोन करून चोर आल्याची माहीती दिली . शेख सुभान यांनी आठ दहा मोटार सायकली घेऊन घटनास्थळ गाठले . तेवढ्यात रात्रीला रडण्याचा आवाज येत असल्याने प्रविण भास्कर दिसागज व अन्य शेजारीही पोहचले . समोरील चौघा जणांना रक्तबंबाळ पाहून उपस्थितांनी चोरट्यांवर दगडफेक सुरु केली . आता आपला निभाव लागत नसल्याचे पाहून चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील पोत , मंगळसुत्र , कर्णफुले ओरबडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला . घटनेमध्ये चौघांनाही डोक्या व हातापायाला जबर मार लागल्याने त्यांना ग्रामस्थांनी पाचोड़ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले . त्यांच्यावर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून केसरबाई व लक्ष्मण जंगले यांना तत्काळ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले . घटनेनंतर पाचोड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक , विशेष दरोडा पथकाने घटनास्थळी धाव घेतली . यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले . या श्वानाने घटनास्थळी चोरट्यांचा पडलेला शर्ट , चपलांवरून मार्ग घेण्याचा प्रयत्न केला दोन किलोमिटरपर्यंत चिखल तुडवत हे श्वानव पोलिस अधिकारी फौजी ढाब्यापर्यंत गेले . त्यानंतर ते तेथेच घुटमळले . यावरून संबधीत चोरट्यानी वाहनाद्वारे पोबारा केला असावा असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे . संबंधित चौधा जखमीवर उपचार सुरु असल्याने अद्याप पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता . पुढील तपास उपविभागिय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक गोरखनाथ कणसे करत आहेत