रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथील एनएसएस स्वयंसेवकांनी आज दिनांक १ ऑक्टोबर 2022 रोजी निवळी येथील माहेर संस्थेस भेट दिली.

यावेळी तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु. पूजा पवार, कु. शुभम सोबळकर, कु.पवन माचिवले, कु.सुशांत गावडे, कु.विनोद पवार,कु.आनंद नेवरेकर तसेच द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.अमित घाणेकर, कु.राहुल रेवाळे, कु.दर्शन खापरे, कु.साहिल वीर या विद्यार्थ्यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांसाठी भजन सादर करून त्यांचे मनोरंजन केले तसेच उपस्थितांना खाऊचे वाटप करण्यात आले. बदलत्या जीवनशैलीमध्ये दुर्लक्षित होत चाललेल्या ज्येष्ठ नागरिकांना आपण आपल्या आयुष्यात सामावून घेतले पाहिजे तसेच त्यांच्या अनुभवांचा उपयोग आपण करायला हवा हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी माहेर संस्थेचे मा. श्री. कांबळे व महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा.अवनी नागले तसेच माहेर संस्थांचे सर्व जेष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सचिव मा.श्री.रोहित मयेकर,संचालक मा. श्री. सुरेंद्र माचिवले तसेच महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य स्नेहा पालये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.