परभणी/प्रतिनिधी

 जिल्ह्यातील धानोरा काळे (ता.पूर्णा) येथील शेतकरी विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर औरंगाबाद येथे उपोषणास बसले आहेत. रस्त्याचे भूसंपादन नसताना धानोरा काळे ते बानेगाव पाटी माहेर पाटी रस्त्यापर्यंत ह 16 फुटाचा गाडी रस्ता आहे, त्याला राज्य रस्ता 235 असे नामांकन करून या शेतातील कोणत्याही जमिनीचे भूसंपादन किंवा अधिकरण झालेले नाही. त्यामुळे धानोरा काळे येथील शेतकरी विष्णू मारोतराव काळे, जनार्दन दत्तराव काळे, चम्मच बाबुराव काळे, बाळासाहेब बापूराव काळे, उद्धव बालासाहेब काळे, दत्ता ज्ञानोबा काळे, जगन्नाथ रंगनाथ काळे, साहेबराव शिंदे, कैलास सोपानराव काळे उपसरपंच बालासाहेब केरबाजी काळे, जनक प्रकाश काळे, मोतीराम माणिक काळे, भगवान विश्वनाथराव कुलकर्णी आदी शेतकरी उपोषण करीत आहेत.