संगमेश्वर : देवरुख नजीकच्या हातीव येथे नुकतेच प्राईड इंडिया, व आत्मा, भूमिपुत्र शेतकरी गट, व ग्रामपंचायत हातीव यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू लागवड मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोंद्रे सर, प्रमुख उपस्थिती म्हणून BDO श्री शिंदे, डॉ जयेश यादव, माजी जि प . अध्यक्ष सौ रश्मी कदम, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, आत्मा BTM यादव मॅडम, सरपंच नंदु कदम, गावातील प्रमुख मान्यवर, द प्राईड इंडिया चे राहुल साळवी, गिरीश राणे, सौरभ सावंत , राकेश मेस्त्री आणि सचिन रसाळ व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शिबिरात बांबू लागवडीचे फायदे आणि त्यापासून मिळणारे लाभ सांगण्यात आले. कोकणातील वातावरणात बांबू उत्तम रीतीने वाढतो , कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.