शिवराज नवरात्रउत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या तीन दिवशी शिबिरास गावातून गावाबाहेरून लोकांचा प्रतिसाद अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ सामाजिक हेतू समोर ठेवून हे शिबराचे आयोजन करण्यात आले होते
तीन दिवशी असलेल्या शिबिरास पहिल्या दिवशी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर यावेळी नेतृतज्ञ गणेश मस्केआणि त्यांची टीम बीड ब्लड बँकेचे संपर्क अधिकारी रविकिरण गिरी आणि त्यांची टीम यांच्या सहकार्याने शिबिर राभवण्यात आले यावेळी 21 जणांचे रक्तदान आणि 80 जणांची डोळ्याची तपासणी करण्यात आली.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी आरोग्य तपासणी शिबिरास यावेळी डॉ. सुनील गायकवाड आणि त्यांचे टीम ,स्त्रीरोगतज्ञ जाधव मॅडम व अनिल चाळक आणि त्यांचे टीम यांच्या सहकार्याने 170 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन च्यावेळी मार्गदर्शक म्हणून एपीआय प्रताप नवघरे, प्रेरणादायी वक्ते प्रा.हरे राम काकडे योद्धा अकॅडमी चे संचालक कृष्णा पाठक , प्रा.सुरेश गरड सर अध्यक्ष म्हणून माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तर सर यांच्या उपस्थित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शिवराज नवरात्र उत्सव समिती चे अध्यक्ष व सदस्य राजू मस्के नारायण मस्के ,अशोक मस्के, माऊली बरबडे, शाम मस्के, बळीराम मस्के, विशाल तौर, शेख रफिक, सोपान बरबडे ,दिगंबर मस्के, प्रवीण साबळे, महादेव मस्के, देशभूषण सरसमकर, यांच्या भव्य शिखराच्या नियोजनाने सर्व स्तरातून शिवराज ग्रुपचे कौतुक होत आहे. कार्यक्रम राबवण्यास विशेष सहकार्य अॅड डी.डी. मस्के यांच्या सर्वांच्या सहकार्याने भव्य शिबिर संपन्न.
गेल्या अनेक वर्षापासून शिवराज गणेशोत्सव, दुर्गा देवी उत्सव निमित्त सामाजिक उपक्रम राबवत आहेत पुढेही तसेच उपक्रम राबवत राहणार शिवराज ग्रुपच्या वतीने आव्हान करण्यात आले.