*बलासा रोड वरील दुर्गा माता दौड कार्यक्रम आनंदात साजरा*

जिंतूर 

येथील बलासा रोडवर दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौडच्या दुर्गा मातेचे पूजन प्रा. अनिल गणपूरकर आणि प्रा. संदीप वजीर यांचे हस्ते करण्यात आले. श्री दुर्गा माता दौडचे आयोजन श्री शिवप्रतिष्टन हिंदुस्थान जिंतूर तर्फे करण्यात आले होते. यनिमित्य परिसरात रांगोळी काढून भक्तांनी पूजन केले. सदरील कार्यक्रम देवीचे मांडणी केल्यापासून दररोज कारण्यात येत आहे. नवरात्रीची शेष्टी म्हणजे सहव्या दिवशी दुर्गा देवींची कट्ट्यायानी रूपात पूजा केली जाते. मताच्या या रूपात पूजा केल्याने साधकांचे मन आज्ञा चक्रत स्थिर होते आणि अर्थ, धर्म, काम, मोक्ष या चारही फळाची प्राप्ती होते. यामुळे साधक नियमित पूजा करून समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. बलासा रोडवरील भक्तांनीही सार्वजनिक नवरात्र चे आयोजन करून दररोज नियमित पुजाकरून मंडळ दांडियासाह विविध कार्यक्रम पार पाडीत आहेत.