चिपळुणात रिपब्लिकन पक्षाचा ३ ऑक्टोबरला वर्धापन दिन सोहोळा
चिपळूण : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ६६वा वर्धापन दिन सोहोळा येत्या दि.३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. शहरातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरा करण्यात येणार आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना दि. ३ ऑक्टोबर १९५७ रोजी स्थापना झाली होती. यंदा रिपब्लिकन पक्षाचा ६६वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचा वर्धापन दिन संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. रिपब्लिकन पक्षाच्या ६६व्या वर्धापन दिन सोहोळ्याचे औचित्य साधून आंबेडकरी चळवळीसाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाईचे तालुका अध्यक्ष प्रशांत मोहिते असून स्वागताध्यक्ष चिपळूण शहराध्यक्ष मंगेश जाधव आणि सूत्रसंचालन उमेश सकपाळ, तसेच प्रमुख मार्गदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रितम रुके करणार आहेत. तसेच या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप तालुका अध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू तसेच रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य दादासाहेब मर्चेडे, महाराष्ट्र प्रदेश संघटक संदेश मोहिते, मुंबई प्रदेश चिटणीस विठोबा दादा पवार, मुंबई प्रदेश सरचिटणीस विवेक पवार, कोकण प्रदेश संपर्क प्रमुख सुशांत सकपाळ, जिल्हा प्रवक्ते अनंत पवार, युवक जिल्हा अध्यक्ष आदेश मर्चेडे आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
 
  
  
  
  