उदगीर अकॅडमी गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा आज संपन्न झाला विशेष म्हणजे हा पारितोषिक वितरण सोहळा अकॅडमीच्या पहिल्या बॅचेस ची गुणवंत विद्यार्थिनी डॉक्टर कु ऋतुजा शिवराज अंबुलगे हिच्या हस्ते झाले जी विद्यार्थिनी इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत उदयगिरी अकॅडमीत शिक्षण घेत होती विविध बक्षिसे मिळवत शेवटी सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एमबीबीएस पूर्ण केले तिच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला हे या कार्यक्रमाचे विशेष यावेळी ऋतुजा अंबुलगे हिने विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले आणि अकॅडमीच्या गौरवशाली इतिहासाची मी साक्षी असल्याची कबुली अत्यंत अभिमानाने दिली यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकॅडमीचे संचालक प्रा गोपाळ कृष्ण घोडके यांनी केले. यावेळी अकॅडमीचे सहसंचालक प्रा संतोष पाटील व डॉक्टर धनंजय पाटील आणि प्रा. श्री गण रेड्डी उपस्थित होते.