औरंगाबाद, दिनांक 30 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो. ऑक्टोबर महिन्याचा लोकशाही दिन 3 ऑक्टोबर रोजी स. 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तक्रार, निवेदनकर्त्यांनी स्वत: उपस्थित राहून तक्रार दाखल करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.