रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स हे दुकान फोडून रोख ३२ हजार रुपये लांबवणाऱ्या तीन संशयितांचा न्यायालयाने जामिन मंजूर केला.
फिरोज इसरार आलम ( ४८ , रा . उत्तरप्रदेश ) , मोहम्मद सुफियान मोहम्मद अब्बास ( २७ , रा . कानपूर उत्तरप्रदेश ) , मोहम्मद अझरुद्दीन मेहम्मद हनीफ ( २२, रा.कासीमनगर उत्तरप्रदेश ) अशी जामिन मंजूर करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत . त्यांनी निर्मल रमेश ओसवाल ( ३३ , रा . आठवडा बाजार , रत्नागिरी ) यांच्या आठवडा बाजार येथील यश ट्रेडर्स नावाचे दुकान फोडून गल्ल्यातील रोख ३२ हजार रुपये चोरुन नेले होते . शहर पोलिसांच्या पथकाने गोवा येथील कळंगुटमधून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.त्यांच्याकडून चोरीला गेलेली रोख रक्कमही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.