रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डेना याना ड्युटीवर असताना मारहाण केल्याची घटना 2019 मध्ये झाली होती. याबाबतची फिर्याद बोल्डे यांनी दाखल केली होती. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. याप्रकरणातील संशयित आरोपीला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. मुन्नेश बळीराम कुवळेकर ( रा . चवंडे वठार) असे निर्दोष सुटलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपीच्या वतीने ॲड. अमित शिरगावकर यांनी काम पाहिले.

सविस्तर वृत्त असे की, सिव्हील हॉस्पीटल येथील आयसोलेशन वार्ड मधील महिला रूग्ण वॉर्डमध्ये 20 मे 2019 रोजी 12.30 ते 1 वा. चे दरम्याने हा प्रकार घडला. तत्कालीन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ . अशोक बोल्डे हे राऊंड करीत असताना मुन्नेश बळीराम कुवळेकर हा महिला रूग्णांच्या वार्डमध्ये दारू पिवुन मोठमोठ्याने आरडाओरड करून वाद घालत होता. त्यावेळी डॉ. बोल्डे व त्यांच्या सोबतच्या स्टाफने समजावुन सांगुन मुन्नेश याला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट तो डॉ . बोल्डे व इतर स्टाफला मोठ्याने ओरडून शिवीगाळ करू लागला. यावेळी डॉ . बोल्डे यानी शांत राहण्यास सांगुन बाहेर जा असे सांगितले असता मुन्नेश याने तुम्ही कोण असे बोलुन डॉ . बोल्डे याना धकलाबुकल केली. डॉ.बोल्डे हे शासकीय काम करत असताना त्यांच्याशी झटापट करून त्यांच्या अंगावरील शर्ट फाडुन नुकसान केले. तसेच डॉ . बोल्डे यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर बो यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. मुन्नेश याचे विरूध्द भा.द.वि.कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ , ४२७ महा. पो. का. कलम ११२/११७ सह मु.प्रो . का . कलम ८५ ( १ ) ( २ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोषारोप पत्र न्यायालयात सादर करणेत आले होते.

 या आरोपीच्या वतीने ॲड. अमित अनंत शिरगांवकर यानी कामकाज पाहिले होते. त्यांचा उलटतपास व युक्तीवाद ग्राहय धरून रत्नागिरी येथील प्रथम वर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यानी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.