सोलापुर : कोर्टी ते आवटी रस्ता मुदतीत पूर्ण न केल्यामुळे आरएसआयआयएल-एनपी-इन्फ्रा प्रा. लि. कंट्रक्शन कंपनीला लाखो रुपयांचा दंड आकारल्याचे खोटे पत्र देऊन जनशक्ती संघटनेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ तसेच सांभवी कार्यकारी अभियंता-निरंजन तेलंग यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी शेकडो महिला घेऊन दि.30/09/22 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय,अकलूज यांच्या कार्यालयासमोर बांगडी घेऊन आंदोलन करणार असल्याचे निवेदन जनशक्ती संघटनेने दिले आहे. या निवेदनात पुढे लिहिले आहे की दौंड-करमाळा -परंडा-बार्शी ते उस्मानाबाद राज्य महामार्ग-68 या रस्त्याची दुरुस्ती व सुधारणा करणे बाबतच्या कामात निविदा शर्तीनुसार विहित मुदती मधील काम अपूर्ण होते.याबाबत जनशक्ती संघटनेने आंदोलन केल्यानंतर दि.18/02/2022 रोजी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,करमाळा यांनी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज निरंजन तेलंग यांच्या सांगण्यानुसार सदर कंट्रक्शन कंपनीला प्रतिदिन ८.५० लाख रु. इतक्या दराने दंडाची आकारणी चालू असल्याचे पत्र जनशक्ती संघटनेला दिले होते. परंतु सदर कंट्रक्शन कंपनीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने आकारलेल्या कोणत्याही दंडाची वसुली केलेली नाही.जनशक्ती संघटनेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केली आहे. सदर कन्स्ट्रक्शन कंपनी व ठेकेदारांना कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग हे पाठीशी घालत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. कार्यकारी अभियंता निरंजन तेलंग यांची पूर्व पार्श्वभूमी पाहता तेलंग हे पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग,पुणे येथे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक देवानघेवाणीतून ठेकेदारांना निविदा मधील अटी व शर्तींची पूर्तता न करता कामे दिलेले आहेत.तसेच बोगस बिले अदा करण्यात आलेले आहेत.याबाबत विविध संघटनांनी भ्रष्टाचाराबाबतच्या अनेक तक्रारी शासन दरबारी प्राप्त आहेत.वादग्रस्त अधिकारी तेलंग यांची एफडीए प्रकरणात अकलूज येथे बदली झालेली असून निरंजन तेलंग यांनी अकलूज विभाग येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.यातून तेलंग यांनी मोठ्या प्रमाणात नामी-बेनामी संपत्ती जमवली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने जनशक्ती संघटनेची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे-पाटील यांच्या आदेशानुसार व महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांना सोबत घेऊन मा.कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज यांच्या कार्यालयासमोर दि. 30/09/2022 आज़ शुक्रवारी बेमुदत बांगडी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
মৰাণৰ আটা গুদামত উদ্ধাৰ হোৱা কৃষি বিভাগৰ ৩৬ বেগ ঘেহু নিজৰ জিম্মাত ল'লে কৃষি।বিভাগে।
মৰাণৰ আটা গুদামত উদ্ধাৰ হোৱা কৃষি বিভাগৰ ৩৬।বেগ ঘেহু কৃষি বিভাগ নিজৰ জিম্মালৈ আনি কৃষি বিভাগৰ...
Upcoming SUV: 2024 में Hyundai कर रही इन तीन SUV को लाने की तैयारी, एक EV भी होगी शामिल
साउथ कोरियाई वाहन निर्माता Hyundai Motors की भारतीय ईकाईओर से भारत में जल्द ही तीन SUV को...
'15 दिन की कैद', मानहानि मामले में शिवसेना UBT सांसद संजय राउत दोषी करार
मुंबई। मानहानि केस में शिवसेना यूबीटी नेता संजय राउत दोषी करार दिए गए हैं।...
KYC में आज Commercial Vehicles के Sales Outlook पर Eicher Motors के Vinod Aggarwal संग खास बातचीत
KYC में आज Commercial Vehicles के Sales Outlook पर Eicher Motors के Vinod Aggarwal संग खास बातचीत