सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर शाळा या अभियानात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरी करण राज्य स्तरावरील कार्यशाळे मध्ये करणेत आले आहे. युनिसेफ ने उपक्रमा बद्दल जिल्हा परिषदेचे कौतुक केले
सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर शाळा या अभियानात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरी करण राज्य स्तरावरील कार्यशाळे मध्ये करणेत आले आहे. युनिसेफ ने उपक्रमा बद्दल जिल्हा परिषदेचे कौतुक केले आहे.
युनिसेफ व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने दोन दिवसीय संवाद व क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा मधून स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम राबविणेत आला होता. या उपक्रमाबद्दल अपर मुख्य सचिव संजीव जैसस्वाल, उप सचिव अभय महाजन, संचालक रणधीर सोमवंशी, युनिसेफ चे युसूफ कबीर यांनी या उपक्रमाचे. कौतुक केले आहे.
शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, प्राथमिक शिक्षक यांनी मेहनत घेऊन हे अभियान राबविले. शिक्षणाधिकी डाॅ. किरण लोहार , शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, प्राथमिक शिक्षक यांनी मेहनत घेऊन हे अभियान राबविले. शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार व जिल्हा स्तरावरील टीम ने हे अभियान यशस्वी पणे राबविले. ७ कोटी रूपया पेक्षा अधिक कामे लोकवर्गणी मधून करणेत सिईओ दिलीप स्वामी यांना यश आले.
राज्य स्तरीय कार्यशाळेत या अभियानाचे सादरीकरण जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. या प्रसंगी आयटीसेल त्रिमुर्ती राऊत यांनी बनविलेल्या माहिती पटाचे सादरीकरण करणेत आले. कोविड नंतर राज्यात स्वच्छ सुंदर शाळा अभियान राबविणार सोलापूर जिल्हा परिषद एकमेव असल्याचे युनिसेफ चे जयंत देशपांडे यांनी सांगितले.
स्वच्छ सुंदर शाळा मघ्ये सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत परसबागा, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गांडुळ खत प्रकल्प, व स्वच्छता या प्रमुख बाबींचे सादरीकरण करणेत येणार आहे.संवाद सल्लागार सचिन सोनवणे, समन्वयक शंकर बंडगर, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे हे सहभागी झाले आहेत. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सल्लागार यांची निवड केली आहे.