रत्नागिरी : जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तृतीयपंथीय समस्या, तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात करण्यात आली आहे.
सदर समितीमार्फत जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांच्या तक्रारी समस्या सोडविल्या जाणार आहेत. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय, अधिकारीता मंत्रालयामार्फत तृतीयपंथांना ओळखपत्र, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदरचे ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी तृतीयपंथी व्यक्तींनी www.transgender.dosje.gov.in या पोर्टलवर तात्काळ ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. तृतीयपंथीय नागरिकांनी आपल्या काही तक्रारी असल्यास सामाजिक न्यायभवन, कुवारबाव, रत्नागिरी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे.