सावळी बु. येथे शेळीपालन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
जिंतूर
जिंतूर: तालुक्यातील सावळी बु. येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने दहा दिवसीय शेळीपालन प्रशिक्षणाची सुरुवात झाली असून या प्रशिक्षणाला मार्गदर्शक म्हणून मंगेश कोमटवार, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय आयुक्त डॉ.भिवाजी जोंधळे व संचालक जितेंद्र सिंह कुशवाह हे मार्गदर्शन करीत आहेत.
दि.२१ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या दहा दिवसीय शिबिरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी आधार महिला ग्राम संघ व सावळी गावच्या सरपंच डॉ. सौ. सुरेखा संतोष घुगे, सीआरपी अरुणा पंढरीनाथ विंधे व सर्व ग्रामस्थांनी घेतली आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांनी स्वतः स्वयंरोजगार सुरू करावे या उद्देशातून ग्रामपंचायतचे मार्गदर्शक भारत घुगे व उपसरपंच योगानंद नागरे यांच्या अथक प्रयत्नातून प्रशिक्षण पूर्ण केले जात आहे. अशी माहिती संचालक जितेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली