भारतरत्न , गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्मदिवस लोकसेवा संकुल फुलगाव, पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुण्यातील सुप्रसिध्द गायक श्री. जितेंद्र भूरुक प्रस्तुत ' स्वरलता ' या कार्यक्रमांतर्गत हिंदी - मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. लोकसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलन आणि लतादीदींच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांमध्ये गाण्यांची आवड निर्माण व्हावी, आपले जीवन संगीतमय असावे तसेच लता दीदी यांच्या आठवणी जाग्या व्हाव्या या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पुणे जिल्ह्यातील लतादीदीप्रेमी तसेच संगीतप्रेमीनी मोठी गर्दी केली होती. पुण्यातील सुप्रसिध्द गायिका कोमल कृष्ण, पल्लवी अनदेव, वैजू चांदवले इत्यादी गायिकानी कलाविष्कारांनी जमलेल्या रसिकांना भुरळ घातली.

  प्रसिद्ध क्रीडा शिक्षक  राजीव देव, गणेश पायगुडे यांनी दीपप्रज्वलन आणि लतादिंच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर लेखक सुरेश ओसवाल लिखित 'लतादीदी एक हृदय आठवण ' या पुस्तकाचे प्रकाशन गायक  जितेंद्र भुरुक, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  दीपक पायगुडे आणि संपत सकोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच ' चला आपणच बदलुया राजकारण ' लेखक  सुरेश ओसवाल याही पुस्तकाचे प्रकाशन लोकसेवा ई स्कूल च्या प्राचार्या जया चेतावणी, प्रकाश शिवले , शशांक अमराळे, फॉर द पीपल न्युज चे मुख्य संपादक   दीपक दराडे , गणेश गोडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 त्यानंतर लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे सौ. सावित्री कुंभार ,  लूर्ददास, राहुल बोडके, अमोल घाटे, रमा भट्टाचार्य,  सोमनाथ वानखेडे,विकास कुंथाळे, संदीप जाधव, रणजित देशमुख या पुण्यातली गुणवंत संगीत शिक्षकंचा सन्मान करण्यात आला. 

त्यानंतर लोकसेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष  श्रीधर चव्हाण यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. 

लोकसेवा ई स्कूलचे कला शिक्षक  दिनेश खरात यांनी रेखाटलेले लतादीदींचे हस्तचीत्र गायक भूरुक यांना भेट देण्यात आले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य  नरहरी पाटील सर यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव, टेन टी इंटरनॅशनल स्कूल फुलगाव, लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूल फुलगाव , तसेच लोकसेवा ई स्कूल पाषाण यांच्या संयुक्त माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नेताजी सुभाष चंद्र बोस नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळा फुलगाव चे प्रशासकीय अधिकारी  अर्जुन शिंदे  तसेच प्राचार्य  अमर क्षीरसागर , टेन टी. इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शोंफीमोन , लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य  डेन्सिंग  व लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूल फुलगावच्या प्राचार्या सौ लक्ष्मी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ' स्वरलता' हा कार्यक्रम पार पडला.

  लोकसेवा प्रतिष्ठान संचलित सर्व शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी पुणे शहरातून तसेच पुणे जिल्ह्यातून रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पांडुरंग जगताप यांनी केले.