पाटोदा (प्रतिनिधी) हजारो भक्ताचे श्रद्धास्थान व पाटोदा तालुक्याचे ग्रामदैवत संगमेश्वर मंदिराचे शिखर पडून अनेक वर्षे झाली संगमेश्वर मंदिराच्या पुन:र्निर्माणासाठी प्रशासनाला वेळोवेळी मागणी करूनही पुरातन विभाग झोपेची सोग घेत असल्यामुळे संगमेश्वर मंदिराच्या पुन: र्निर्माणासाठी वेळोवेळी मागणी करून पुरातन विभाग पाटोदा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या

संगमेश्वर मंदिराच्या पुन:र्निर्माणासाठी साधू संत यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन संभाजीनगर येथील पुरातन विभागाच्या कार्यालया बाहेर संगमेश्वर घंटानाद आंदोलन करणार असा इशारा युवा नेते जितेंद्र भोसले यांनी दिला असून लवकरच पुरातन विभागाने पाटोदा तालुक्याचे ग्रामवैभव नामशेष होण्यापूर्वीच वाचवण्यासाठी काम सुरू करावे नसता पुरातन विभागाच्या निषेधार्थ संभाजीनगर मधील कार्यालया बाहेर आंदोलन करु असा इशारा युवानेते जितेंद्र भोसले यांनी दिला आहे