देशाशी गद्दारी करणाऱ्या पिएफआय या देशद्रोही संघटनेवर बंदी आणून त्यांच्या नांग्या ठेचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे आभार! या देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्या पिल्लावळींनो, आली रे आली, आता तुमची बारी आली..! असा इशारा माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांनी दिला आहे.
पुण्यामध्ये मोर्चा पार पडल्यानंतर आमदार सातपुते यांनी एक व्हिडिओ शेअर करत पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देणाऱ्या वरती कारवाई करण्याची मागणी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा आमदार सातपुते हे आक्रमक झाले आहेत.