देशाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या अंतर्गत माळशिरस मतदारसंघातील फोंडशिरस येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार सातपुते यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील देखील होते.
या शिबिरात नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी, रक्तदान शिबीर आणि शुगर तपासणी करण्यात आली. दिवसभरात 220 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, नगरसेवक अँड.राऊत साहेब, दिपक काळे, माजी उपसभापती सुभाष कुचेकर, शिवाजीभाऊ गोरे, नंदन दाते, माजी व्हाईस चेअरमन सावता ढोपे, शिवामृतचे संचालक अरविंद भोसले, संजय गोरे, केशव कदम, सरपंच पोपट बोराटे, सभापती हनुमंत कुभांर, पं.स सदस्य हनुमंत पाटील, संतोष महामुनी, लक्ष्मण गोरे, संपत ढोपे, संभाजी गोरे, रोहिदास रणदिवे, शंकर पाटील, शिवदास ठोंबरे, अमोल वाघमोडे, माजी सरपंच संजय वाघमोडे,भैया चांगण, माजी सरपंच निकेतन साळवे, उपसरपंच शिवाजी लवटे, रणवीर देशमुख, राहुल सोरटे, अजित शिरतोडे, सरचिटणीस सुरज मस्के, अमित पुंज, सुनील बनकर,संगीता राऊत, कृष्णदेव रणदिवे, संजय वाघमोडे, मल्हार ठोंबरे, अनिल इंगळे, दिलीप शेंडे, भारत गोरे, शामराव शेंडे, प्रशांत शेंडे, अरविंद भोसले, बिनू पाटील, अमोल गोरे, मनोज जाधव, हरी पाटील, तेजस गोरे, सुनील दाते, वैभव रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.