बीड (प्रतिनिधी) काठोडा तालुका बीड या गावांमध्ये आज सकाळी नऊ वाजता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा श्री सानप साहेब यांच्या शुभहस्ते गावात घरोघरी वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचबरोबर पानंद रस्त्याचे दोन उद्घाटन झाली. व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडला. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सुरुवात झाली. जनावरांना लंपी रोग प्रतिबंधक लस देण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप करण्याचा जिल्ह्यात पहिला प्रयोग बीड तालुक्यातील काठोडा या गावांमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे भूमिपुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुण नाना डाके हे होते. कार्यक्रमाचे नियोजन गावचे लोकप्रिय सरपंच बाळासाहेब डाके,ग्रामसेवक इनकर साहेब व सर्व ग्रा प सदस्यांनी तसेच जि प शाळा काठोडा व गीते वस्ती येथील मुंडे मॅडम मोरे मॅडम कापसे सर राऊत सर यांनी केले.
मान्यवरांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले तसेच मा पंचायत समितीचे सदस्य अच्युत अण्णा शेळके विस्तार अधिकारी श्री मोरे साहेब वांगी केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा के मु अ तिडके मॅडम आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक अंकुश डाके या सर्वांची समायोजित भाषणे झाली. या कार्यक्रमाला उपस्थित सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नामदेव बप्पा डाके, जिल्हाध्यक्ष अशोकराव तांगडे, इंद्रजीत बापू डाके, मा उपसरपंच सुभाष गीते, माजी सरपंच पांडुरंग डाके, मा सरपंच रावसाहेब वाघमारे, मोहन वाघमारे, श्याम ओव्हाळ, मधुकर ओव्हाळ,जेष्ठ नागरिक विठ्ठल भाऊ डाके, जय राम डाके गावातील सर्व महिला पुरुष विद्यार्थी उपस्थित होते. आदरणीय डाके नानांनी आपल्या भाषणामध्ये सर्वांचे आभार मानले व उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम डाके यांनी केले.आभार मोरे मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा डाके,रामा ओव्हाळ,अविनाश डाके, केशव डाके, सुदाम गीते, द्वारकाबाई वाघमारे, सोजरबाइ ओव्हाळ, हनुमान डाके, शहादेव डाके, सतीश गीते, कृष्णा डाके, आसाराम नाईकवाडे, दादा वाघमारे, प्रमोद वाघमारे, भीमराव ओव्हाळ, बंकट डाके, विनायक डाके, भाऊसाहेब वाघमारे, नाना वाघमारे, शेळके इत्यादी सह कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता चहापानाने झाली.