परभणी(प्रतिनिधी)पूर्णा तालुक्यातील बानेगाव अंतर्गत माहेर ही गट ग्रामपंचायत असून या गावात रस्ता आणि पुलाच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजना केली असून गावातील रस्त्याच्या कामासाठी साठ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी माहेर ग्रामपंचायतीच्या रस्त्याचे आणि पुलाचे काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना तात्काळ आदेशित केले आहे.

माहेर या गावास ग्रा.मा. 80 माहेर ते मुंबर 4.5 की.मी, ग्रा.मा. 79 माहेर जोडरस्ता रा.मा. 235 पासून ग्रा.मा. ग्रा.मा. 78 ला मिळणारा मार्ग, ग्रा.मा. माहेर ते फुलकळस 5.0 की.मी. याप्रमाणे तीन पोहोच रस्ते आहेत. 

या रस्त्यावर नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे काम सुरू आहे. या रस्त्याची शाखा अभियंता व उपमुख्य कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करून अंदाजपत्रक तयार केले असून सदरील रस्ता जिल्हा नियोजन समिती सन 2022 - 23 मध्ये प्राधान्याने घेण्यासाठी रुपये साठ लाख एवढ्या निधीची मागणी केली असून निधीस मंजुरी मिळताच रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

उपविभाग परभणीमार्फत मैल कामगार मार्फत रस्ता वाहतुक योग्य करण्याबाबत काम करण्यात येत आहे.