परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत,कारण अशी माणसं जीवनाचं तत्त्वज्ञान शिकलेली नसतात तर जगलेली असतातयांची जीवनी म्हणजे तत्त्वज्ञानाचे पुस्तकच असते....!

अगदी असेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती आहे...असे बालमटाकळी जि.अहमदनगरचे भूमिपुत्र उप आयुक्त मा.प्रदीप भोगले साहेबांनी बीड येथे जातपडताळणी विभागाचा काही दिवसांपूर्वी ऍडिशनल पदभार स्वीकारला आहे.

साधी राहणी... उच्च विचार आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या नवनिर्वाचित साहेबांचे बीड व बोधेगाव येथील कैकाडी समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या स्वागतप्रसंगी मढीचे मानकरी नारायणबाबा जाधव, जनप्रहारचे संस्थापक अध्यक्ष विजयभाऊ गायकवाड, कैकाडी समाज एकता मंचचे राज्य कार्याध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, जय यशचे संचालक अनिल कैवाडे, आकाश गायकवाड,शिवदत्त जाधव, विठ्ठल गटगिळे आदी उपस्थित होते.