स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे शिल्पकार संदीप कांबळे मातृभूमी प्रतिष्ठान कडून सन्मानित करण्यात आले.
स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचा तीनफुट उंचीचा अर्धाकृती पुतळ्याचे शिल्पकार संदीप कांबळे यांचा मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या बाबत अधिक माहिती अशी स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी प्रेरणा घेऊन संदीप जगन्नाथ कांबळे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन शिवाजी पुतळा चौकामध्ये पेंटिंगचे काम करून गेली दोन-तीन वर्षापासून साहेबांच्या पुतळ्याचा अभ्यास करून नुकताच दोन महिन्यापूर्वी बीड जिल्हा भाजपा सरचिटणीस ऍड. सर्जेराव तात्या तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा फायबरचा तीन फुट उंचीचा अर्धाकृती पुतळा तयार करण्याचे काम संदीप कांबळे, बाळासाहेब कांबळे व जगन्नाथ कांबळे यांनी सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 पुतळ्याचे काम सध्या जोरदार चालू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एॅड. सर्जेराव तात्या तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव येथील दसरा मेळाव्यात भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा. डॉ प्रीतम ताई मुंडे यांच्या हस्ते अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करून विक्री शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या बुकिंग ची नोंदणी सुरू आहे नोंदणीसाठी मोबाईल 97 67 67 90 35 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान सोमवार दि. 27 सप्टेंबर 22 रोजी अजय आर्ट वर्क्सशॉप ग्रामसेवक कॉलनी नगर रोड बीड येथे जाऊन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. संजय तांदळे व लक्ष्मण चाटे यांनी संदीप कांबळे बाळासाहेब कांबळे, जगन्नाथ कांबळे यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.