आष्टी (प्रतिनिधी) भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन नगरपंचायत कार्यालयात आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा.आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन नगराध्यक्षा सौ.पल्लवी स्वप्निल धोंडे यांच्या हस्ते करण्यात आले..सर्व रोग निदान शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळून शेकडो नागरीकांनी मोफत आरोग्य तपासणी औषधे वाटप करण्यात आले.

आष्टी,पाटोदा,शिरूर कासार मतदारसंघात आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहेत.याचेच औचित्यसाधून मंगळवारी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन आष्टी नगरपंचायत कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी आष्टी शहरासह तालुक्यातील शेकडो गरजू रुग्ण व नागरिकांच्या मोफत तपासणी करण्यात आल्या.या शिबिरामध्ये अहमदनगर येथील साईमाऊली सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रसिद्ध व अनुभवी डॉक्टरांमार्फत मोफत उपचार करण्यात येणार आले.यावेळी आयोजकांकडून मोफत औषधे वाटप करण्यात आले.आलेल्या रुग्ण व नागरिकांची एम.डी. मेडीसिन डॉ. संतोष गिते,हाडांचे स्पेशालिस्ट डॉ.पंकज वरपे,बालरोग तज्ञ डॉ. गणेश मिसाळ,दंतरोग तज्ञ डॉ.तुकाराम गीते,स्त्रीरोग तज्ञ डॉ.योगिता पवार या तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या टीमने तपासणी करून पुढील उपचारबाबत योग्य सल्ला दिला.आयोजकाकडून मोफत औषधे वाटप करण्यात आले.यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,सरपंच सचिन लोखंडे,नगरसेवक शरीफ शेख,किशोर झरेकर,सुनील रेडेकर,जिया बेग,सुरेश वारंगुळे,अक्षय धोंडे,इर्षान खान,शमीम शेख,भारत मुरकुटे,डॉ.राहुल टेकाडे,सचिन रानडे,उपसरपंच सागर धोंडे,स्वप्निल धोंडे,शमी भाई,कपिल अग्रवाल,बाळासाहेब घोडके,नवीनशेठ कासवा,पत्रकार शरद रेडेकर, पत्रकार प्रविण पोकळे,पत्रकार गणेश दळवी,पत्रकार अविशांत कुमकर,पत्रकार अविनाश कदम,श्याम वाल्हेकर, आदींसह मान्यवर,नागरीक व गरजु रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.