नातेपुते शहराच्या मुख्य पेठेतील हनुमान चौकात
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
राहणारे सेवानिवृत्त शिक्षक शिरीष पांडुरंग दिक्षीत यांच्या बंद घराचा कोयंडा उचकटून घरात प्रवेश करून चोरी केली आहे. त्याच रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान सावरकर चौकामध्ये राहणारे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय भगवान पाठक यांच्या घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून घरामधील असलेल्या तिजोरी तसेच कपाटांचे कोयंडे तोडून घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी केली आहे. सदरची घटना रविवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री घडली.
सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याचप्रमाणे प्रकाश रामचंद्र पलंगे यांचा मुलगा दवाखान्यात अॅडमिट असल्याने ते घराला कुलूप लावून रात्री ११.३० वाजणेच्या दरम्यान दवाखान्यात गेले होते. पहाटे ५.३० वाजता घरी आले असता घराचे कुलूप तोडलेला दिसले. त्यातील १० हजार रुपये किमतीची ३.५ ग्रॅमची सोन्याची कर्णफुले, ९ हजार रूपये किमतीची १३ ग्रॅमची सोन्याची बाळी, ३ हजार रूपये किंमतीचे १२ भार वजनाचे चांदीचे वाळे, ७००० रुपयाची रोख रक्कम असा एकुण २९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोराने घेऊन पोबारा केला आहे. पोलीस प्रशासनाकडून श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना बोलवून ठसे घेण्यात आले आहेत. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स.ई. ज्योती बैनवाड करीत आहेत.