शेतकरी, शेतमजूर, कामगार, नौकरदार, ग्राहक महिला-पुरुषांनी आपल्यावर होणारा अन्याय सहन न करता सदैव सेवेत असणारे शिव संघर्ष ग्रुपचे मावळे आपल्या अन्यायाला वाचा फोडून योग्य न्याय मिळवून देतील आपण फक्त आवाज दया ! असे आवाहन शिव संघर्ष ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी अन्यायग्रस्त नागरिकांना केले आहे.

     भारतातील सर्व नागरिकांना आपले जिवन जगतांना भारतीय राज्यघटनेने काही मूलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत. ते हक्क आणि अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एखादयावर कोणी विनाकारण अन्याय करत असेल तर आपल्याला न्याय देण्याचे काम महाराष्ट्रातील शिव संघर्ष ग्रुप करेल. आपण फक्त हाक दया....शिव संघर्ष ग्रुपचे मावळे आपल्याला मदत करतील. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी सर्व नागरिकांना केली आहे. 

     पुढे बोलतांना सुरेश पाटोळे म्हणाले की, भारतातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, नौकरदार, यांचे जीवन अतिशय निराशाजनक दिसत असून अनेक नागरिकांना बीपी-शुगर व मानसिक आजार होत असून कारखानदार, संस्थानिक, मालक- भांडवलदार इत्यादी प्रस्थापित सर्वसामान्य नागरिकांना गुलामीत ठेवून त्यांच्यावर अन्याय करत आहे. अश्या अन्यायग्रस्त नागरिकांनी फक्त हाक दयावी आम्ही सर्व ग्रुप चे मावळे आपल्याला मदत करू...असेही आवाहन केले आहे.